पिंपरी : भारीप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने भारतीय संविधान दिना निमीत्त एच.ए शाळेतील विद्यार्थ्यांना संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवारी (दि.27) दुपारी तीन वाजता पिंपरीतील एच.ए.शाळे येथे होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपल सबनीस असणार आहेत. तसेच ए.ह.बुरसे, राजेंद्र गायकवाड, दिलीप देहाडे, माणिक गोरे, राजाभाऊ ओव्हाळ, तुकाराम गायकवाड, संजय सोनवणे, नवनित अहिरे, संदिप चौधरी आदी उपस्थित असणार आहेत. विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व कळावे, त्यांना आपला देश,कायदे कसे तयार झाले याची संपुर्ण माहिती मीळावी या हेतून विद्यार्थ्यांना संविधानाचे वाटप केले जाणार आहे.