सोयगाव – सोयगाव बस आगाराचे चालक वासुदेव आडे याचे, मंगळवारी पहाटे निधन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.शोकाकुल वातावरणात त्यांचेवर बुधवारी १२ वाजता मार्कंडा ता.कडम जि.यवतमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोयगाव आगाराचे चालक वासुदेव गोविंदराव आडे (वय-४९)यांचे निधन झाले. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोयगाव ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.