सोयगावला मराठा समाजाच्या जातीचे दाखले वितरण

0

तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या हस्ते दाखले वाटप

सोयगाव – मराठा समाजाला आरक्षण जाहिर झाल्यानंतर सोयगाव तालूक्यातील पहिला मराठा जातीचा दाखला तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या हस्ते गजानन गव्हाड व ज्ञानेश्वर पाटील यांना वितरीत करण्यात आला. सोयगाव येथील गजानन गव्हाड व ज्ञानेश्वर पाटील यांनी सर्व कागद पत्रांची पुर्तता करुन मराठा जातीच्या दाखल्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने सर्व बाबींची पुर्तता झाल्यानंतर सोयगाव तालुक्यात पहिला मराठा जातीचा दाखला तहसीलदार प्रविण पांडे यांचे हस्ते वितरीत केला. यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे, ना. तहसीलदार प्रभाकर गवळी, जाधव साहेब, तलाठी नाना गायकवाड, महा-ई-सेवा केंद्र संचालक दिपक फुसे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना नायब तहसिलदार प्रभाकर गवळी यांनी सांगितले कि, ७ डिसेंबर २०१८ रोजी मराठा जातीच्या आरक्षणाबाबत शासना आदेश जारी केला. त्यानंतर तालुक्यातील पहिला दाखला वितरीत करण्यात आला.तसेच दाखले मिळविण्यासाठी विध्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.