सोयगाव। गुरुवार पासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाने धोक्यात आलेली खरीपाची पिके तरारल्याने शेतकरी समाधानी झाले आहे.सहा दिवसापासून पावसाने मारलेली दडी खरिपाच्या पिकांना घातक ठरली असतांना झालेल्या पावसाने पिकांना तारले आहे. सोयगाव परिसरात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली होती.
मध्यंतरीच्या काळात पिकांच्या वाढीसाठी शेतकर्यांनी मोठे प्रयत्न केले, परंतु महिनाभर पावसाने दडी मारल्याने पिके अशक्त झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यावरही शेतकर्यांनी पिकांना सशक्त करण्यासाठी रासायनिक खतांचा मारा करून पिकांना पोषक वातावरण केले. परंतु गेल्या सहा दिवसापासून पावसाने खंड दिल्याने सलाईनवर असलेली खरीपाची पिके पुन्हा संकटात सापडली होती. परंतु ता.27 झालेल्या रिमझिम पावसात खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाल्याने पिके तोर्यात दिसत होती.