सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

0
नोंदणीसाठी आधारकार्ड आणि सातबारा आवश्यक
मुंबई : सोयाबीन पिकाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.  १ ऑक्‍टोबरपासून सोयाबीन पिकाच्या खरेदीसाठीच्या नोंदणी प्रकियेला सुरुवात झाली असून, ऑनलाईन नोंदणीनंतरच शेतकऱ्यांना आपली कडधान्ये हमीभाव केंद्रावर विकता येणार आहेत. अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. हमीभावाच्या माध्यमातून केवळ शेतकऱ्यांच्याच शेतमालाची खरेदी व्हावी, या उद्देशाने सरकारने शेतीमाल विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सक्‍तीची केली आहे.  १ ऑक्‍टोबरपासून सोयाबीन पिकाच्या खरेदीच्या ऑनलाईन प्रक्रियेस सुरुवात झाली असून,  मूग, उडीद सारख्या पिकाच्या ऑनलाईन खरेदी नोंदणी प्रक्रियेची २५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे.
पिकांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड आणि सातबारा उतार आवश्यक करण्यात आला आहे. नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी केंद्रावर नेता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, अशा प्रकारच्या माध्यमातून गैरप्रकाराला आळा बसेल असा दावा सरकारने केला आहे.  सोयाबीन पिकाला प्रति क्विंटल दर ३ हजार ९९ रुपये ठरवण्यात आला असून, पिकाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी ठरवण्यात आला आहे.