सोयी सुविधांसाठी सदैव कटीबद्ध

0

शिरपूर । तालुक्यात सर्वांसाठी पाणी व उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. भूजल पातळी वाढविण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांच्या जमिनीला मुबलक पाणी देण्यासाठी काम शिरपूर पॅटर्न टाईप जलसंधारणाच्या माध्यमातून सुरु आहे. यातूनच शेतांपर्यंत रस्ते देखील तयार होत आहेत. लवकरच बोराडी, अर्थे, खंबळे परिसरात दर्जेदार इंग्लिश स्कूल होणार असून आपल्या मुलामुलींसाठी सोय उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा. इंदिरा हॉस्पीटलला चांगल्या सुविधा देत आहोत. मुंबई व इतरत्र चांगल्या आरोग्यसेवेचा ला्भ मिळण्यासाठी आरोग्यसेवक नियुक्त केला असून त्यांच्याशी संपर्कात राहून सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले.

शेतकर्यांनी सहकार्य करावे
प्रास्ताविक युवराज बाविस्कर यांनी केले. ह.भ.प. खंडू कोळी, माजी सरपंच रोहिदास कोळी मनोगत व्यक्त केले. सुरेश खानापूरकर यांनी शासनाचा निधी व भाई स्वत: तसेच मित्रपरीवार यांच्या सहकार्यातून जलसंधारणाचे काम पुढे नेण्यात येत असल्याचे सांगितले. यासाठी शेतकरी बांधवांनी सहकार्याची भावनेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचलन लक्ष्मण कोळी यांनी केले.

आ.अमरिश पटेल यांचे मार्गदर्शन
तालुक्यातील खामखेडा प्र. आंबे येथे माजी शिक्षणमंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते शिरपूर पॅटर्न टाईप बंधार्‍याचे भूमिपूजन व कामास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सुरेश खानापूरकर, जि.प.सदस्या प्यारीबाई बंजारा, प्रेमराज बंजारा, सरपंच रामलाल पावरा, प्रसन्न जैन, नितीन गिरासे, राजेंद्र पाटील, ग्रा.पं. सदस्या जनाबाई कोळी, भोईटी सरपंच हिरालाल पावरा, उपसरपंच सुरेश कोळी, रामभाऊ कोळी, रविंद्र भिल, प्रकाश भिल, महेंद्र ढिवरे, तसेच परिसरातील गावांचे पोलिस पाटील, शिरपूर पिपल्स बँक संचालक संजय चौधरी, भालेराव माळी यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.