सोशल डिस्टन्सिंग, मास्क बांधा सांगणेही शासकीय कर्मचार्‍यांसाठी ठरतेय डोकेदुखी

0

रावेर : फैजपूर प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या सूचनेवरून वाहन चालक उमेश तळेकर यांनी रावेरमध्ये काही लोकांना कोरोना वायरसपासून बचावासाठी मास्कर बांधण्याचे सांगताच त्यांच्या सोबत असलेल्या काही लोकांनी गैरवर्तन करून हुज्जल घातल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी रावेर-यावल तलाठी संघटनांनी उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला आहे.

निवेदन देवून कारवाईची मागणी
6 रोजी फैजपूर प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रावेरात आल्यानंतर त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परीसरात काही फळविक्रेत्यांसमोर गर्दी दिसून आली. यावेळी सोशल डिस्टसिंग ठेवा, मास्क वापरा याबाबतच्या सूचना प्रांतधिकारी देत असतांना त्यांचे वाहन चालक उमेषा तळेकर यांच्याशी काही जणांनी हुज्जत घातली. याबाबत रावेर पोलिसात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी तलाठी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना व कोतवाल संघटना यांच्यातर्फे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांना निवेदन देण्यासाठी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर रावेर, यावल तलाठी संघटनेचे अध्यक्ष हनीफ तडवी, दीपक गवई, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप जयस्वाल, शिरस्तेदार साळुंखे, रशीद तडवी सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, लिपिक आदी उपस्थित होते.