सोशल डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे वह्या वाटप

0

नवापुर । सोशियल डेव्हलपमेंट फाऊंडेशन तर्फे सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी देखील महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्ताने 12 एप्रिल रोजी होतकरु व आर्थिकदृष्टया दुर्बल विद्यार्थ्याना वह्या व पेन वाटपाचा कार्यक्रम श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीषकुमार नाईक हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणुने म्हणुन नगराध्यक्षा रेणुका गावीत, नगसेवक आरिफ पालावाला, अजय पाटील, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक चंद्रकांत नगराळे, आयुब बलेसरीया, नगरसेविका प्रा ज्योती जयस्वाल, तहसिलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलिस निरीक्षक रामदास पाटील, उपनिरीक्षक दिपक पाटील, डॉ.प्रा लता सुरवाडे, पुरवठा निरीक्षक मिंलिद निकम, मुख्याध्यापक मिलिंद वाघ, आर. व्ही. पाटील, हरीष पाटील, विनय गावीत, संतोष बिराडे, रमेश पानपाटील, संजय वाघ, आदी उपस्थित होते. यावेळी 200 विद्यार्थाना चेअरमन शिरीष नाईक, नगराध्यक्ष रेणुका गावीत यांच्या हस्ते केल्या. सुत्रसंचालन डॉ.प्रा. नितिन माळी यांनी केले तर आभार संजय ठोसरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रकात नगराळे, राहुल शिरसाठ, संजय ठोसर, राहुल अहिरे, अभिजीत महिरे, ललीत बिराडे, यांनी कामकाज पाहिले.