जळगाव : दर्जी फाऊंडेशन व जिल्हापरिषद स्वच्छता अभियान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आय.ए.एस., आय.पी.एस. व आय.आर.एस. ची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना सामाजिक भान असावे व आपले सामाजिक दायित्व काय असते याची ओळख व्हावी यासाठी आय.सी.डी.सी. सोशल फोरमतर्फे निरनिराळे सामाजिक उपक्रम शनिवारी घेण्यात आले. यावेळी उपक्रमाद्वारे पाण्याचे महत्व, स्वच्छतेचे महत्व ग्रामस्थ यांना करून देण्यासाठी भुसावळ तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीमध्ये विद्यार्थ्यांनी योगदान देवून जनजागृती केली. साकेगावातील आर्थिक दुष्टया दुर्बल मागासवर्गीय व रोजंदारीवर काम करणार्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना आय.सी.डी.सी. सोशल फोरमच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे धडे दिले. त्यात त्यांनी नखाद्वारे होणारे विविध आजार यांची माहिती दिली.
सामाजिक दायित्वचे भान असावे
उपक्रमासाठी जिल्हा परिषद स्वच्छ भारत अभियान विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, जिल्हा समन्वयक निलेश रायपूरकर तसेच दर्जी फाऊंडेशनचे संचालक गोपाल दर्जी आदी उपक्रमात सहभागी होती. यानंतर आय.सी.डी.सी. च्या विद्यार्थ्यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. तसेच स्वच्छ भारत अभियान गीत सादर करण्यात आले. सर्व तरूणाईने वर्षाची अखेर सामाजिक उपक्रमात सहभागी होवून केल्याबद्दल दर्जी फाऊंडेशन परिवार व जिल्हा परिषद अधिकारी वर्गांने त्यांचे कौतुक केले. या उपक्रमात आय.सी.डी.सी. सोशल फोरमचे सदस्य ईश्वर हिरे, निकीता वाणी, प्रगती शर्मा, ममता परदेशी, अक्षदा पाडवी, योगिता वळवी, आरती ठाकरे, वैष्णवी मौर्य, भाग्यश्री नेरपगार, मोनिका लोढा, प्रेरणा मंडोरा, भाग्यश्री सुरवाडे, राकेश देवरे, शुभम महाले, किरण नांद्रे, चेतन शिरसाठ, उमेश महाले, शुभम पाटील, मयुर जंगले इत्यादी विद्यार्थ्यांनी गावकर्यांना व शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे दर्जी फाऊंडेशनकडून होणार्या अधिकार्यांना सामाजिक दायित्वचे भान असावे त्यासाठी प्रत्येक शनिवारी महानगरपालिका क्षेत्रातील किंवा जिल्ह्यातील इतर क्षेत्रातील अशा मुलांसाठी कार्य करण्याचे मानस आहेत. तरी काही सामाजिक संस्था किंवा समाजसेवकांनी आम्हाला गरजु वस्ती व मोहल्याची माहिती दर्जी फाऊंडेशनच्या कार्यालयास द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश सुर्यवंशी, उमेश सैदांणे, व जिल्हा परिषदेचे निलेश रायपूरकर यांचे सहकार्य लाभले.