कविता पवार ; रावेर येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम
रावेर :- सोशल मिडियाच्या वाढत्या प्रभावातदेखील मुला-मुलींनी पैकीच्या पैकी गुण मिळवणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. वर्षभर अभ्यास केल्याचे फळ गुणगौरव कार्यक्रमातून मिळते, अये प्रतिपादन उद्योजिका तथा लेखिका कविता पवार यांनी येथे केले. एका शाळेच्या सांकृतिक व गुणगौरव कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उपनगराध्यक्षा संगीता अग्रवाल, मुन्ना अग्रवाल, दिलीप कांबळे, राजेंद्र खिरवडकर, अशोक शिंदे, दिलीप अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
डॉ.सुधाकर पाटील, चंद्रकांत अग्रवाल, अनिल अग्रवाल, प्रदीप श्रीकृष्ण, लखमसी पटेल, गोपाल दुबे, अशोक वाणी, राजकुमार जैन, मोहन बारी, कमल शेलोळे मनोहरलाल शर्मा, जयंत कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.