यावल : सोशल मिडीयावर हातात बंदुक व तलवार बाळगून टाकलेला व्हिडिओ तालुक्यातील दगडी येथील पिता-पूत्रांच्या अंगलट आला असून यावल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हिरामण मोतीराम मोरे (55 ) व अशोक हिरामण मोरे (25) अशी अटकेतील पिता-पूत्रांची नावे आहेत. सोशल मिडीयावर मिळणार्या लाईक करीता मुलाने बापासोबत रायफलसह तलवार घेवून व्हिडिओ तयार केला. सिनेमातील संवादासह रूबाबदार व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल होताच तो यावल पोलिसांपर्यंत पोहोचला. यावल निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, हवालदार संजय देवरे, निलेश वाघ, भूषण चव्हाण, योगेश खडके, चंद्रकांत पाटील संशयीतांना अवघ्या दोन तासात शस्त्रांसह पिता-पूत्रांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.