सोशल मिडीयावर प्राध्यापक तरुणीची बनावट खात्याद्वारे बदनामी

Defamation by posting obscene photos of young professor on social media : Crime Against One जळगाव : बोदवड शहरातील 24 वर्षीय प्राध्यापक तरुणीच्या नावाने फेक प्रोफाईल बनवून त्यावर अश्‍लील फोटो टाकून तरुणीची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर पोलिसात गुन्हा
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोदवड शहरातील प्राध्यापक असलेली 24 वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 10 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर रोजीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने तरूणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून तीच्या ओळखीचे व मित्रांना रीक्वेस्ट पाठवून तिची बदनामी व्हावी यासाठी बनावट खात्याच्या स्टेटसवर महिला व पुरूषांचे अश्लिल फोटो ठेवून बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूणीने शनिवारी, 24 सप्टेंबर रोज जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने सायंकाळी अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहे.