सोशल मिडीया वादावरुन 16 जणांवर गुन्हा दाखल

0

धरणगाव। भाजपा शिवसेनेत सुरु असलेल्या सोशल मिडीयावरील वाद चव्हाट्यावर आले असून दोन्ही गट एकमेकांना भिडले आहे. परस्पर विरोधी मजकूर टाकल्याने कार्यकर्ते एमेकांना भिडले. याविरुध्द 16 जणांविरोधात दंगलीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तडजोडीचे प्रयत्न दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्यांकडून होत आहे मात्र यात अपयश आल्याने भाजपाच्या नगरसेवकासह सहा जणांविरुध्द तर शिवसेनेच्या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली फिर्याद भाजपा नगरसेवक भालचंद्र माळी यांनी दिली आहे. राहूल रोकडे, योगेश वाघ, महेंद्र महाजन, मोहन महाजन, भगवान महाजन, किशोर महाजन, विनोंद रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही