सोशल मीडियावर बदनामी करणारे 17 जणांवर गुन्हा

0

धुळे । शहरातील जुने धुळे भागात रहाणार्‍या एका युवतीच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट उघडून तीची बदनामी केल्याप्रकरणी नकाणे रोडवरील एसआरपी कॉलनीत रहाणार्‍या तरूणासह 17 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या धुळ्यातील एका 26 वर्षीय युवतीच्या नावे नकाणे रोडवरील एसआरपी कॉलनीत रहाणार्‍या संघरत्न उर्फ बंटी रघुवीर मोरे याने फेसबुकवर फेक अकाऊंट उघडले. हा प्रकार 23 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास डला. त्यानंतर या अकाऊंटवर असलेल्या सदर युवतीच्या मोबाईलवर अन्य 17 जणांनी फोन करून तीच्याशी अश्‍लिल संभाषणाचा प्रयत्न केला. याप्रकरणी सदर युवतीने पश्‍चिम देवपूर पोलिसात तक्रार केली असून संघरत्न उर्फ बंटी रघुनाथ मोरेसह 17 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.तपास महिला सपोनि एस.एम.भांडे करीत आहेत.