मुंबई : सोशल मीडिया द्वारे कधी कोण फेमस होईल सांगता येत नाही. काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. हा बापलेकीची मजेदार विडिओ संपूर्ण दुनियेत फिरून लोकांना पसंतीस पडतोय हे पाहायला मिळतेय.
https://twitter.com/TrinaWesson/status/1049248264891944960
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱया या बापलेकीच्या जोडीची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. अनेकजणांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. यात जी गोंडस मुलगी आहे, तिचे नाव ‘मायला’ असे आहे. या व्हिडिओत ती आणि तिचे वडील ‘गर्ल लाईक यु’ या गाण्यावर लिपसिंक करताना दिसत आहेत. या व्हिडिओत या गोंडस मुलीचे हावभाव पाहण्यासारखे आहेत.