सौदागरमध्ये विचित्र अपघात

0

पिंपरी-चिंचवड : रहाटणी – पिंपळे सौदागर येथील साई चौकामध्ये मागील काही वषार्पासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवार चौकाकडून वाकडकडे जाताना 45 मीटर रस्त्यावर लोखंडी बार लावण्यात आला आहे. त्यामुळे ठराविक उंचीचीच वाहने येथून जाऊ शकतात. असे असतानाही या बारपेक्षा जास्त उंचीचा ट्रेलर येथून नेण्याचा प्रयत्न एका चालकाने सकाळी सातला केला. परिणामी ट्रेलर धडकल्याने हा लोखंडी बार तुटला. तुटलेला लोखंडी बार ट्रेलरमध्ये अडकला. त्यामुळे पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. सकाळी कामावर जाण्याची वेळ असल्याने हिंजवडीकडे निघालेल्या आयटीयन्सना अपघाताचा फटका बसला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून आयटीयन्स या कोंडीत अडकले होते. दरम्यान, चालक फरार झाला.