सौम्यजीतला दुहेरी मुकुट

0

नवी दिल्ली । सांतियागो येथे झालेल्या सीमास्टर 2017 आयटीटीएफ चॅलेंज चिली खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या सौम्यजीत घोषने एकेरी आणि दुहेरी गटात सुवर्णपदकाची कमाई करीत दुहेरी यश मिळवले. अव्वल मानांकित घोषने अ‍ॅन्थनी अमलराजचा 4-2 (8-11, 13-11, 11-6, 11-9, 11-7) असा पराभव करीत एकेरीचे विजेतेपद पटकावले. त्याआधी घोषने अमलराजच्या साथीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले.