राधाईनगरीतील सौरउर्जा प्रकल्प उभारला
पिंपरी : हा प्रकल्प 15 केएम क्षमतेचा असून त्यासाठी नऊ लाख 50 हजार खर्च आला आहे. या प्रकल्पामुळे पूर्वी महावितरणचे 22 ते 25 हजार रुपये बिल येत असे ते आता शून्यावर येणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक बचतसुद्धा होणार आहे. या प्रकल्पासाठी शासकीय 30% सवलत (सबसिडी) उपलब्ध आहे, असे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. पिंपळे सौदागर येथील राधाईनगरी सोसायटीने इमारतीच्या गच्चीवर सौरऊर्जा विद्युत निर्मिती प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाचे उद्घाटन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
सौरउर्जेचा वापर करावा
शत्रुघ्न काटे पुढे म्हणाले की, मोठ्या प्रमाणात सूर्याची ऊर्जा उपलब्ध असून त्याची जाणीव लोकांना नाही. उलट स्वयंपाक करण्यासाठी लोक निसर्गातील झाडांची तोड करून घरे भरून ठेवतात. प्रतिवर्षी असे करून एकीकडे पर्यावरणाचा र्हास तर दुसरीकडे वाढते प्रदूषण. परंतु यावर लोक फारसा विचार करत नाहीत. म्हणून जर सर्वच लोकांनी सूर्यापासून मोफत मिळणार्या ऊर्जेचा वापर सुरू केला तर कालानुरूप लोकांमध्ये बदल घडण्यास वेळ लागणार नाही. सौर कुकर, सौर बंब, सौर दिवे यांचा लोकांनी वापर करावयास सुरुवात केली तर पर्यावरण धोक्यात येणार नाही
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी राधाईनगरी सोसायटीच्या या उपक्रमाबद्दल सोसायटीच्या पदाधिकार्यांचे व रहिवाशांचे अभिनंदन केले. तसेच परिसरातील सर्व सोसायट्यांनी आपापल्या सोसायटीमध्ये सौरऊर्जा विद्युत प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.