सौरव गांगुलीची कुंबळे -विराट वादावर प्रथमच प्रतिक्रिया

0

कोलकत्ता । चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताच्या पराभवापेक्षाही विराट -कुंबळे याच्यातील वादावर चर्चा झाली.यासाठी बीसीसीआयने मधस्थी करण्याचा प्रयत्न ही केला होता. यावादावर कोणीच आपली प्रतिक्रिया दिली नव्हती.मात्र प्रथमच कुंबळे व विराट याच्यातील वादाबाबत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पहिल्यांदा आपले मत व्यक्त केले आहे.

कुंबळे-विराट यांच्यातील मतभेद हे परिपक्वपणे दूर करण्याची गरज होती. चॅम्पियन्स ट्राफीतील पराभवानंतर अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील मतभेद हे चर्चे करून सोडविता आले असतो.असेही यावेळी गांगुली म्हणाला.गांगुली म्हणाला की, ‘कुंबळे आणि कोहली यांच्यातील वाद अतिशय संयमीपणे हाताळणे गरजेचे होते. हे प्रकरणे योग्य पद्धतीने सोडवता आले असते.’क्रिकेट सल्लागार समितीतील तीन सदस्यांमध्ये गांगुलीचाही समावेश आहे. त्यामुळे प्रशिक्षक निवडीमध्ये गांगुलीचा सक्रिय सहभाग आहे.