स्काऊट गाईडमुळे शिस्त लागते – टी.टी.बडगुजर

0

शिरपूर । स्काऊट गाईडच्या नियम, तत्व, विविध उपक्रमांमुळे जीवनाला शिस्त लागते व विविध संकटांना तोंड देण्याची जाणीव निर्माण होते असे प्रतिपादन टी.टी.बडगुजर यांनी केले. बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात स्काऊट गाईडच्या विद्यार्थीनींनी मेळावा आयोजित केला होता.

यावेळी कोणत्याही भांड्याचा वापर न करता नारळाची करवंटी,झाडाची पाने इ.परिसरातील साहित्याचा वापर करून बिनाभांड्याचा स्वयंपाक व विविध अत्यावश्यक साहित्य तयार केले.यात विविध भाज्या,भाकरी,भाताचे प्रकार,असे 51 पदार्थ तयार केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखाप्रमुख टी. टी.बडगुजर, होते तर पर्यवेक्षक एस.आर.बडगुजर, सी.एम.कुलकर्णी,गणेश भामरे, एन.एम.सोनवणे, टी.टी.ढोले, निरज निकम,इ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गाईड शिक्षिका भानुमती ठाकरे, वैशाली पवार ज्योती पावरा यांनी परिश्रम घेतले .या उपक्रमाचे किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भाऊसो तुषार रंधे तुषार रंधे,जिल्हा स्काऊट गाईडच्या आयुक्त आशाताई रंधे,संस्थेचे सचिव निशांत रंधे,यांनी कौतुक केले.