जळगाव। सुबोध बहुउद्देशिय युवा विकास प्रतिष्ठान संचलित स्कॉलर डिजीटल इंग्लिश मिडीयम स्कूलचे उद्घाटन शिवाजीनगर, भुरे मामलेदार प्लॉट धनाजी काळे नगर येथे नुकतेच झाले. उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, नगसेवक नवनाथ दारकुंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल सपकाळे, उत्तम शिंदे होते. अध्यक्षस्थानी जवान फाऊंडेशनचे अध्यक्ष ईश्वर मोरे हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा
कार्यक्रमाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार भोळे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, पालकांनी खूप अभ्यासाच्या मागे न लागता विद्यार्थ्यांना सुदृढ बनवावे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात मोरे यांनी मुलांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल, त्यांना काय नवीन गोष्टी शिकवू शकतात याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रियंका चौधरी, प्रस्तावना अनिल जाधव तर आभार सुबोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक सुरळकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी बाळासाहेब बोरकर, अभय चंद्रात्रे, नितीन भावसार, निर्मला रेनकुन्टवार, विशाल पांढरे, अभिषेक शर्मा, ज्योती लोखंडे, वंदना कळसकर यांनी परिश्रम घेतले.