‘स्टारडस्ट अचीव्हर्स अवॉर्ड -2017’चे आयोजन!

0

मुंबई । मागील काही काळापासून विशेषतः मुंबई सह अन्य भागांतही तरुणींवर असिड हल्ल्याच्या घटनांची मोठी वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. असिड हल्ल्यात बळी पडलेल्या अशा तरुणींचे आयुष्य अत्यंत खडतर झाल्याचे नंतरच्या काळात समोर आले आहे. अभिनेता सोनू सूद आणि स्टारडस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अशा असिड हल्यातील बळी पडलेल्या तरुणींना मदत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडीत आहेत. नुकत्याच 21 सप्टेंबर रोजी 2017 ला पार पडलेल्या दुबई मधील ’स्टारडस्ट अचीव्हर्स अवॉर्ड -2017’ मध्ये सोनू सूद आणि त्यांना या कमी मदत करणारे बल अ‍ॅडव्हटायझर्स जाहिरात क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या व्यवस्थापकीय संचालक संजीव गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले. संजीव गुप्ता यांना या प्रसंगी बहिस्थ जाहिरात उद्योगा साठी च्या पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले. संजीव गुप्ता यांनी याबद्दल बोलताना सांगितले की,आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना अवॉर्डच्या ज्युरी मेंबर्स आणि उद्योग जगतातील महत्त्वाच्या नावांनी ओळखले. यासाठी त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे.