शिवसेनेची माजी मंत्री सुरेश जैन , मलुखमैदान तोफ ना. गुलाबराव पाटलांवर भिस्त
जळगाव । महापालिका निवडणूकीत भाजप-सेना युतींचे संकेत शिवसेनेचे जेष्ठ नेत सुरेशदादा जैन यांनी निवडणूक जाहिर होण्यापूर्वींच दिले होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच मुंबई येेथे जावून मुख्यमंत्र्यांची भेट घेवून युतीचा प्रस्ताव ठेवला. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ना. गिरीश महाजन हे युती व जागा वाटपाबाबत पुढे बोलणी करतील असे सांगितले. मात्र, ना. महाजन यांनी तसा कोणताही संपर्क ठेवला नसल्याचा निर्वाळा सुरेशदादा यांनी पत्रकार परिषदेत केला होता. यातच सेनेने व भाजपने प्रचारावर भर देतांना बडे नेते येतील अस जाहिर केले होते. मात्र, निवडणूकीला केवळ एक दिवस उरलेला असतांना दोघ पक्षांतील मोठ्या नेत्यांनी प्रचारात हजेरी लावलेली दिसली नाही. काँग्रेसाचा एकही नगरसेवक नसल्याने त्यांच्यासाठी वीन वीन स्थिती आहे. तर राष्ट्रवादीचे काही नगरसेवकांनी तसेच खाविआ व मनसेच्या काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भावजींचे आवाहन
शिवसेनेने गृहिणींचे मत मिळविण्यासासाठी होम मिनीस्टर फेम आदेश बांदेकर यांना बोलविले होते. बांदेकर यांनी घरोघरी जावून वहिनींना शिवसेनेस मतदान करण्याचे आवाहन केले. तर शिवसेनेतर्फे मुलूखमैदान ताफ म्हणून प्रसिध्द असलेले ना. गुलाबराव पाटील यांनी जेष्ठ नेते सुरेशदादा जैन यांच्यासोबत सभा घेतल्या. जेष्ठ नेते जैन व आ. पाटील यांनी संयुक्त प्रचार रॅली काढल्या. भाजपने आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी डिजीटल व्हॉन माध्यमातुन प्रचार करण्यात येत आहे.यात भाजपा कसा विकास करणार याची संकल्पना मांडली आहे.तर शिवसेनेने बॅनरच्या माध्यमातुन शहरभरात प्रगती व विकास कसा होईल याची जाहिरात केली आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोर्चा सांभाळला असून राष्ट्रवादी कॉग्रेसचे नबाब मलिक, चित्रा वाघ यांनी हजेरी लावली. मात्र खरी लढत ही भाजप-सेना यांच्यात होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री येणार म्हणून सागर पार्कवर डोम टाकण्यात आला होता.मात्र ते ही फुस झाले तर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व माजी उपमुख्यमंत्री तथा आ.अजित पवार यांचीही सभा रद्द झाली.तर गेल्यावेळी मनसेचे 12 नगरसेवक असतांना यावेळी एकही उमेदवाराने आपली उमेदवारी दाखल केली नाही.त्यामुळे मनसेचे इंजिन निवडणुकीच्या रिंगणात न उतरताच थांबले. तर एमआयएमने उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट खासदार असदुद्दीन आवेसी यांना आणले होते.
मुंडे व पवार सभा रद्द
राष्ट्रवादी कॉग्रेसचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या सभाचे नियोजन केले होते.मात्र अचानक त्यांची सभा रद्द झाल्या. शिवसेनेकडून मोठ्या नेत्यांची एक मोठी लिस्ट करण्यात आली होती.त्यामध्ये शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, निलीमा गोर्हे, अशी नावे होती.मात्र ऐनवेळी काय झाले यातील एकही नेता आला नाही..तर निलिमा गोर्ह्या आल्या त्यांनी महिलांशी चर्चा केली.असे असले तरी शिवसेना प्रचाराची सर्व धुरा ही माजी मंत्री सुरेश जैन याच्या खांद्यावर येवून पडली होती. त्यांनी प्रत्येक प्रभाग पिंजुन काढला. तर ना.गुलाबराव पाटील यांनी सुध्दा शिवसेनेचा धनुष्य उचलून धरला आणि प्रभागात दौरे करून मतदांचा जोगवा मागितला.
उमेदवारांची घरोघरी जाऊन प्रचाराला पसंती
युतीबाबत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत संभ्रम कायम होता. यातच राजकीय पक्षांनी जाहिरनामा प्रसिध्द न करता प्रचारास प्रारंभ केला होता. जाहिरनामा प्रसिध्द करण्यात शिवसेनेने बाजी मारली. यानंतर राष्ट्रवादी व भाजपने तर सर्वांत शेवटी काँग्रेसने जाहिरनामा प्रसिध्द केला. सर्वंच पक्षांकडून महापालिका निवडणूकीत विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर स्टार प्रचारक शहरात दाखल होतील असे जाहिर करण्यात आले. मात्र, उमेदवारांसह पक्ष देखील त्यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रतिक्षेत राहिले. स्टार प्रचारक नसल्याने निवडणूकीची खर्या अर्थांने रणधुमाळी उठलीच नाही. आरोप-प्रत्यारोप झडलेच नाही. स्टार प्रचारक न आल्याने प्रचाराची सर्व जबाबदारी स्थानिक नेत्यांवर येवून पडली होती. या नेत्यांनी ढोल ताशाच्या गजरात उमेदवारांसोबत गल्लो गल्ली फिरून घरोघरी प्रचारावर भर दिला. राष्ट्रवादीने स्टार प्रचारक आणण्यात बाजी मारलेली दिसली. त्यांनी चित्रा वाघ, नवाब मलिक यांचे सारखे नेते प्रचारासाठी शहरात आणले होते.
ना.महाजनांची ‘एकला चालो रे’ भूमिका
भाजपची सर्व जबाबदारी ही ना.गिरिश महाजन याच्या खांद्यावर देण्यात आली होती. तर आ.सुरेश भोळे हे स्थानिक आमदार असल्याने त्यांनी या निवडणुकीत उडी घेतली होती.तर विधानपरिषद आमदार चंदूलाल पटेल हे सुध्दा याच्या मदतीला होते. आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर नगर पंचायत निवडणुक झाल्यानंतर प्रचारात उतरले. मात्र तेही फक्त त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारात फिरतांना दिसले. भाजपाचे स्टार प्रचारक व मुख्यंमत्री जळगावात येणारे म्हणुन सागर पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, मराठा आरक्षण आंदोलनामुळे काही अप्रिय घटना होवू नये म्हणून त्यांनीही येणे टाळले. त्यामुळे सर्व जबाबदारी ही स्थानिक नेत्यावर येवून पडली. काँग्रेसने प्रचारात आपला प्रभाव दाखविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. काँग्रेसतर्फे आ. अब्दुल सत्तार यांनी प्रचार फेरी कॉर्नर सभा घेतल्या. तसेच मालेगावचे आमदार आसिफ शेख बिलाल चौक, तांबापूरा, पिंप्राळा हुडको येथे प्रचार सभा घेतली. यातून सर्वच राजकीय पक्ष स्टार प्रचारक आले नसले तरी नेत्यांकडून प्रचारात रंग भरण्याचे काम करीत होते. मात्र,प्रचाराच्या अंतीम दिवसापर्यंत प्रचारात रंग भरलाच नसल्याचे चित्र शहरात पहावयास मिळाले.