वाकड – रस्त्याच्या कडेला पार्क केलेली चारचाकी चोरून नेली. ही घटना वाकड येथील काळा खडक येथे शुक्रवारी घडली. याबाबत विशाल बहुजा यांनी अज्ञात चोराविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळा खडक येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास विशाल बहुजा यांनी आपली मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (एम एच 11, ए डब्ल्यू 9279) रस्त्याच्या कडेला पार्क केली. अज्ञात चोरट्याने संधी साधून कार चोरली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.