स्त्रियांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण खेदजनक : लवंगारे

0

विद्या प्रतिष्ठान व द युनिक अकॅडमी यांचे वतीने स्पर्धा परीक्षा व्याख्यान

बारामती । भारतात स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण खेदजनक आहे. या अत्याचार प्रकरणात बलात्कार व छेडछडीचे प्रमाण हे 50 टक्केच्या आसपास आहे , यात धक्कादायक बाब अशी की पती व नातेवाइकांकडून अत्याचाराचे प्रमाण हे 50टक्के आहे. असा राष्ट्रीय गुन्हे समितीचा अहवाल आहे. असा सूक्ष्म पातळीवर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होणे गरजेचे आहे. असे मत स्पर्धा परिक्षेचे तज्ज्ञ मार्गदर्शक हर्षल लवंगारे यांनी व्यक्त केले.

विद्या प्रतिष्ठान व द युनिक अकॅडमी यांचे वतीने स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप व निर्णयक्षमता या विषयांवर ते बोलत होते. लवंगारे यांचा सत्कार डॉ. श्रीराम गडकर व प्रितम पवळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी महिंद्र गावडे यांची निवड झाल्याबद्दल हर्षल लवंगारे व डॉ. श्रीराम गडकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. भरत शिंदे ,प्रा. संजय खिलारे , प्रा. सौ.डॉ. रासकर सुवर्णा , प्रा. राजेंद्र दळवी, प्रा. सुनिल ओगले , वसंत घुले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनिल ओगले यांनी केले.

परीक्षेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज
’स्पर्धा परीक्षा ही नियोजनाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. या परीक्षामध्ये काटेेकोरपणा आलेला आहे. राज्यसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षाचा पूर्व परिक्षेचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच झालेला आहे. परीक्षार्थ्यानी या परीक्षाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून मुळातच अभ्यासक्रम समजून घेण्याची गरज आहे. असेही यावेळी लवंगारे यांनी सांगितले.

ग्रंथालय उपलब्ध करून दिले
अध्यक्ष स्थानावरून बोलतांना डॉ. गडकर म्हणाले या महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्पर्धा परीक्षेकडे चांगलाच ओढा आहे. परीक्षार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे. सुसज्य अशी अभ्यासिका व ग्रंथालय उपल्बध करून दिले आहे. यावेळी प्रा.सुनिल ओगले यांनी प्रस्ताविक केले.