जळगाव । शहरातील भास्कर मार्केट परीसरातील गोदावरी प्रसुतीगृह येथे महिलांसाठी आयोजीत स्त्रीरोग तपासणी शिबीरात पहील्याच दिवशी 60 महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. गोदावरी प्रसुतिगृहातर्फे महिलांसाठी आयोजीत मोफत शिबीराचे उद्घाटन गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांच्या हस्ते धन्वंतरी पुजनाने करण्यात आले. या शिबीरात गर्भवती महिलांची तपासणी तसेच स्त्रीयांचे गर्भाशयाचे विविध आजार जसे गर्भाशयपिशवी,गर्भाशयाचा कँन्सर, गर्भपिशवी काढणे, गर्भाशय गाठीचे आजार, गर्भाशयाचा टयुमर, प्रसुतीपुर्व व प्रसूतीनंतर गर्भवती स्त्रीयांनी घ्यावयाची काळजी व वंधत्व निवारण याबाबत सल्ला व मार्गदर्शन देखिल करण्यात येणार आहे.
शिबीराच्या पहिल्याच दिवशी 60 महिला रूग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीर 15 जून पर्यंत दुपारी 3 ते सायं. 5 यावेळेत राहणार असून शिबीरात जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ श्रीराम कुळकर्णी, नवी दिल्ली येथून ट्रेनिंग घेउन फेलोशिपमध्ये गोल्ड मेडल प्राप्त करणार्या तसेच हिंदुजा हॉस्पीटल मुंबई येथील अनूभव असणार्या प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिति सोनवणे, औरगाबाद येथील प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ.संजय पवार हे महिलांची मोफत तपासणी करीत आहे. तरी गोदावरी हॉस्पीटल भास्कर मार्केट येथे जास्तीत जास्त महीलांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गोदावरी प्रसुतिगृहातर्फे करण्यात आले आहे.