स्थलांतरणावरुन अतिक्रमण कर्मचारी, हॉकर्स पुन्हा भिडले

0

जळगाव । महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सच्या स्थालांतराची कारवाई सुरूवात झाली. मात्र, हॉकर्सचे स्थालांतरण करीत असतांना अतिक्रमण कर्मचारी व हॉकर्समध्ये वाद होवून हाणामारी झाली. झालेल्या हाणामारीत मनपा कर्मचार्‍याला मारहाण झाली. तर भाजीपाला विक्री करणारी महिला बेशुद्ध पडल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णलायात दाखल करण्यात आले. यानंतर अतिक्रमण कर्मचार्‍यांनी शनिपेठ पोलिस स्टेशन गाठत पोलिस निरिक्षकांकडे आपली कैफियत मांडली. ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड वरील 782 हॉकर्सला जागा निश्‍चित करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे त्या ठिकाणी सोमवारी स्थलांतरण करण्यात येणार होते. परंतू सोमवारी हॉकर्स पुन्हा बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड या आपल्या नेहमीच्याच ठिकाणी दुकाने थाटली. सकाळी 11 वाजता स्थालांतरीत करण्यासाठी अतिक्रमण विभागाची गाडी सानेगुरुजी पुतळ्याजवळून येतांना दिसताच हॉकर्स व फळविक्रेत्यांमध्ये पळापळ सुरु झाली. त्यानंतर अतिक्रमण विभागाचे वाहन घाणेकर चौकात येताच त्यांनी आंबेविक्रेत्याची गाडी जप्त करीत असतांना फळविक्रेते व मनपा कर्मचारी यांमध्ये शाब्दिक चकमक होवून वाद निर्माण झाला. त्यानंतर सुभाष चौकात कारवाई करीत असतांना याठिकाणी मनपाच्या चौबे शाळेजवळ भाजीविक्री करणार्‍या महिला व अतिक्रमण विभागातील महिला कर्मचार्‍यांमध्ये चांगली झटापटी झाली. यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

मनपाच्या शाळेत गोंधळ
महानगरपालिकेच्या घाणेकर चौकात असलेल्या रामलालजी चौबे शाळेत काहि हॉकर्स धारकांनी भाजीपाला ठेवला होता. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कारवाई करीत असतांना भाजीपाला विक्रेत्यांनी स्वताहून भाजीपाला रस्त्यावर फेकून मनपा कर्मचार्‍यांशी वाद घातला. हेच नव्हे तर मनपातील अतिक्रमण विभाग शहरातील हॉकर्सच्या स्थालांतरणाची प्रक्रीया करीत असतांना काही हॉकर्सधारकांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनीधींशी वाद घातला. भाजीपाला विक्री करणार्‍या महिलांकडून अतिक्रमण विभागातील कर्मचारी व प्रसारमाध्यम प्रतिनीधींना शिव्यांची लाखोली वाहीली जात होती. दरम्यान, शहरातील हॉकर्स स्थालांतरीत करण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली होती. मात्र हॉकर्स दिलेल्या जागेवर न जाता पुवीच्या जागीच व्यवसाय करीत होते. दरम्यान आज हॉकर्सवर कारवाई करीत असतांना पुर्वी प्रमाणेच हाणामारी होवून तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

हॉकर्स महिलेसह मनपा कर्मचारी जखमी
रामलालजी चौबे शाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या भाजीपाला जप्त करीत असतांना मनपा कर्मचारी व भाजीपाला विक्री करणार्‍या महिलांमध्ये शाब्दिक वाद होवून तुरळक हाणामारी झाली. या वादात भाजीपाला विक्री करणारी लक्ष्मीबाई अरविंद राहीने ही महिला बेशुद्ध झाली. दरम्यान महिलेला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच हॉकर्स व कर्मचार्‍यांमध्ये झालेल्या हाणमारीत भाजीपाल विक्रेता सुनिल मराठे याने अतिक्रमण विभागातील आशाबाई संजय रानवडे यांना काटा मारुन फेकल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.वाहीली जात होती.
घाणेकर चौकात अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कारवाई करीत असतांना सुभाष चौकातील काही भाजी विक्रेत्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत अतिक्रमण विभागातील कर्मचार्यांनी आमचा भाजीपाला फेकल्याचा आरोप करीत गोंधळ घालत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.