स्थायीचा निधी मंजूरीचा धुराळा सुरुच; 33 कोटी 22 लाखांच्या विकास कामांना दिली मंजूरी

0

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्र. 11 मधील मंजूर विकास योजनेतील ताब्यात आलेले रस्ते विकासीत करणेकामी येणार्‍या 22 कोटी 2 लाख रूपयांच्या खर्चासह विविध विकास कामांसाठी येणार्‍या सुमारे 33 कोटी 12 लाख रूपये खर्चास आज (दि.9) सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते. प्रभाग क्र. 19 मधील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणेकामी येणार्‍या सुमारे 29 लाख 43 हजार रूपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 19 मध्ये खडीकरण व डांबरीकरण करणेकामी येणार्‍या सुमारे 29 लाख 43 हजार रूपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. जाधववाडी, कुदळवाडी परिसरात संप व पंप हाउस येथे स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणार्‍या सुमारे 26 लाख 69 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.19 मधील पिंपरी बी ब्लॉक, लिंक रोड, भाटनगर व इतर परिसरात डांबरी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करणेकामी येणार्‍या सुमारे 29 लाख 43 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 19 उद्योगनगर व इतर परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणार्‍या सुमारे 29 लाख 39 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 15 से.क्र.28 व आकुर्डी गावठाण मधील रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणार्‍या सुमारे 29 लाख 44 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आले. प्रभाग क्र. 15 से.क्र.28 व आकुर्डी गावठाण मधील डांबरी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करणेकामी येणार्‍या सुमारे 29 लाख 43 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 19 सुदर्शननगर व इतर परिसरातील मुख्य रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणार्‍या सुमारे 29 लाख 39 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.19 मधील डांबरी रस्त्यांवरील चरांची दुरुस्तीची कामे करणेकामी येणा-या सुमारे 29 लाख 44 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 19 मध्ये रस्त्यांची दुरुस्ती हॉटमिक्स पध्दतीने करणेकामी येणार्‍या सुमारे 29 लाख 39 रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.6 मधील पुणे नाशिक रस्त्यांच्या पूर्व बाजूस स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे 32 लाख 97 रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 10 शाहुनगर परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणार्‍या सुमारे 28 लाख 64 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. 18 प्रभाग क्र.10 मधील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणार्‍या सुमारे 33 लाख 86 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.15 से.क्र.25 व 26 मधील रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणार्‍या सुमारे 29 लाख रूपयांच्या 7 हजार खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 12 तळवडे गावठाण, संत तुकाराम नगर परिसरातील रस्त्यांचे खडीमुरुमीकरण करुन व डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे 34 लाख 25 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 12 तळवडे गावठाण व परीसरामध्ये पेव्हींग ब्लॉक बसविणेकामी येणार्‍या सुमारे 28 लाख 81 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 1 चिखली येथील देहु आळंदी रस्त्यांना जोडणारे रस्ते जी एस बी पी एम पध्दतीने करणेकामी येणा-या सुमारे 34 लाख 5 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 6 मध्ये धावडेवस्ती व परिसरात पेव्हींग ब्लॉकची सुधारणा करणेकामी येणा-या सुमारे 25 लाख 01 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 8 येथे ठिकठिकाणी आवश्यक ठिकाणचे रस्ते खडीमुरुम करुन बी बी एम करणेकामी येणा-या सुमारे 34 लाख 32 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.9 मधील मासुळकर कॉलनी भागातील स्टॉर्म वॉटर लाईन टाकणेकामी येणा-या सुमारे 31 लाख 67 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.20 संत तुकारामनगर येथील सावता माळी गार्डन च्या आजुबाजुच्या परिसरात स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे 25 लाख 30 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. क्रीडा प्रबोधिनी (स्पोर्ट स्कुल) विद्यालयास एक वेळ भोजन पुरवठा करणेकामी येणा-या सुमारे 46 लाख 24 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 9 मधील नेहरुनगर भागातील दफनभुमिचे सीमाभिंतीची व स्थापत्य विषयक कामे करुन सुशोभिकरणाची कामे करणेकामी सुमारे 32 लाख 14 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 9 मध्ये यशवंतनगर भागात रबर म़ोल्डेड पेव्हींग ब्लॉक बसविणेकामी येणा-या सुमारे 32 लाख 21 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.5 मध्ये खडीमुरुम व बीबीएम पध्दतीने रस्त्यांची दुरुस्ती करणेकामी येणार्‍या सुमारे 32 लाख 21 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.5 मधील परीसरात कलर पेव्हींग ब्लॉक बसविणे व स्थापत्य विषयक करणेकामी येणा-या सुमारे 36 लाख 87 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.26 वाकड येथील दत्त मंदीर जवळील अंतर्गत रस्ते व शेखवस्ती व इतर परिसरात डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे 31 लाख 89 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.