सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे पाच कोटी 21 लाख 45 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. प्रभाग क्र. 31 मॅगजीन चौक उद्यान विकसीत करण्यासाठी येणार्या सुमारे 27 लाख 17 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. 12 मधील से.क्र. 22 ओटा स्किमच्या विकसीत झालेल्या इमारतीच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी व देखभालीची कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 30 लाख 96 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
रस्ते सफाईसाठी 1 कोटी
प्रभाग क्र. 44 मधील हेमू कलानी उद्यानात शहीद हेमू कलानी यांचा पुतळा उभारण्यासाठी येणार्या सुमारे 25 लाख 89 हजार रुपयांच्या खर्चास, ‘ग’ प्रभागातील जलनीःसारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करणे व चोकअप काढण्यासाठी येणार्या सुमारे 46 लाख 74 हजार रुपयांच्या खर्चास, महानगरपालिकेस जे.एन.एन.यू.आर.एम अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनसाठी शासनाकडील मंजूर निधीमधून यांत्रिक पध्दतीने रस्ते सफाई करण्यासाठी येणार्या सुमारे 1 कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
पुस्तके खरेदीसाठी 21 लाख
मनपाचे विद्युत विभागासाठी आवश्यक विविध एसी, वॉटर कुलर्स आणि फॅन्स साहित्य खरेदीकामी येणार्या सुमारे 25 लाख 87 हजार रुपयांच्या खर्चास, 26 जानेवारी 2018 रोजी भक्ती-शक्ती चौक निगडी येथे उदघाटनसाठी बिस्किट व पाणी बॉटल खरेदी करण्यासाठी येणार्या सुमारे 27 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड मनपाच्या माध्यमिक विद्यालयासांठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी ते 8 वी व 9 वी ते 10 वीच्या मराठी, इग्रंजी, उर्दु माध्यमासाठी क्रमिक पुस्तके खरेदी करण्यासाठी येणार्या सुमारे 21 लाख 80 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
हॉकी प्रशिक्षणासाठी 56 हजार
पिंपरी-चिंचवड मनपाच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत असलेल्या 18 माध्यमिक विद्यालयातील व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मुलांचे मोरवाडी, मुलींचे कासरवाडीमधील विद्यार्थ्यांना बिस्किट व पाणी बॉटल खरेदी करण्यासाठी येणार्या सुमारे 82 हजार रुपयांच्या खर्चास, जिल्हास्तर शालेय हॉकी स्पर्धा 2018-19 अनुषंगाने 250 विद्यार्थी खेळाडूंचे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम नेहरूनगर, पिंपरी येथे उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यासाठी येणार्या सुमारे सहा लाख 56 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
आरक्षण विकासासाठी 20 लाख
मनपाच्या विद्युत मुख्य कार्यालयाकडील एल.ई.डी. दिये बसविणेकामी येणार्या सुमारे 29 लाख 95 हजार रुपयांच्या खर्चास, मनपाच्या स्थापत्य विभागाकडील क्रांतीवीर चापेकर वाड्याच्या तिसर्या टप्प्याची कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 43 लाख 14 हजार रुपयांच्या खर्चास, मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र. 18 मध्ये ताब्यात येणारे आरक्षणे विकसीत करण्यासाठी येणार्या सुमारे 20 लाख 31 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. या अधिकारी व कर्मचार्यांच्या सेवानिवृत्ती गौरव प्रित्यर्थ समारंभसाठी येणार्या सुमारे तीन लाख रुपयांच्या खर्चास, ‘ह’ प्रभागातील जलनिःसारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करणे व चोकअप काढण्यासाठी येणार्या सुमारे 98 लाख 97 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.