दहावी विद्यार्थ्यांना 6 हजाराचे अर्थसहाय्य
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 17 कोटी 73 लाख 43 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अमृत योजने अंतर्गत 60 भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्याचे काम चार पॅकजेस मध्ये सुरु असून त्याचे नियोजन आरेखन वॉटर ऑडीवर पाणी गळती शोधणे व कामांचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी येणार्या या कामासाठी सुमारे 8 कोटी 91 लाख 93 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
डी.पी.आर.साठी 3 कोटीची मान्यता
पिंपरी ते निगडी (भक्ती शक्ती चौक) व नाशिक फाटा ते चाकण (मोशी मार्गे) या मार्गांवर मेट्रो सुरु करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) तयार करण्यासाठी येणार्या सुमारे 3 कोटी 48 लाख रुपयांच्या खर्चास, महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजने अंतर्गत इयत्ता दहावीमध्ये शिकत असणार्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य 3 हजार रुपयांची त्यात वाढ करुन देण्यात आली असून प्रत्येकी 6 हजार रुपये अर्थसहाय्य अदा करणे, अपात्रतेची पूर्तता करून पात्र ठरणा-या लाभार्थींनी प्रति लाभार्थी अर्थसहाय्य देण्यात आली. येणार्या सुमारे 14 लाख 82 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 13 निगडी गावठाण येथील सेक्टर क्रमांक 22 मधील स्मशानभूमी समोरील ओटा स्कीम क्रमांक 1 ते 6 च्या अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी येणार्या सुमारे 38 लाख 86 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक 17 मध्ये नविन पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी येणार्या सुमारे 32 लाख 59 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांकामध्ये पेव्हिंग ब्लॉक, गटर्स, रस्ते दुभाजक फुटपाथ व मनपा इमारतींची किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 41 लाख 35 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत बालाजीनगर झोपडपट्टी व उर्वरित ठिकाणी मलनि:स्सारण नलिका टाकण्यासाठी येणार्या सुमारे 1 कोटी 39 लाख 60 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. ’अ’ प्रभागातील जलनिःसारण नलिकांची वार्षिक ठेकेदार पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढणेचे काम करण्यासाठी येणार्या सुमारे 1 कोटी 39 लाख 60 हजार रुपयांच्या खर्चासही बैठकीत मान्यता देण्यात आली. ’इ’ प्रभागातील जलनिःसारण नलिकांची वार्षिक ठेकेदार पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढणेचे काम करण्यासाठी येणार्या सुमारे 1 कोटी 16 लाख 5 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.