अर्थसंकल्पावर नगरसेवकांनी केली चर्चा; सदस्यांनी सूचवली दुरुस्ती
भुसावळ– स्थायी समितीच्या बैठकीला सत्ताधारी गटाचे सदस्य मुकेश गुंजाळ व जनआधारचे सदस्य नुरजहाँ खान यांनी सदस्यांनी मंगळवारी दांडी मारली. पदसिध्द सभापती तथा नगराध्यक्ष रमण भोळे रजेवर असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. सभेला जनआधारच्या नगरसेवक सदस्यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली.
पालिकेने सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 123 कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प तयार केला आहे. या अर्थसंकल्पावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत चर्चा करुन किरकोळ दुरुस्ती सुचविण्यात आली. सोमवार, 26 रोजी होणार्या विशेष सर्वसाधारण सभेसमोर हा अर्थसंकल्प मंजूरीसाठी ठेवण्यात येईल. अर्थसंकल्पासाठी मंगळवारी पालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या सभेत प्रभारी नगराध्यक्ष लोणारी, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी अर्थसंकल्पातील जमा व खर्च बाजूंवर माहिती दिली. हा अर्थसंकल्प 123 कोटी रुपयांचा व शिलकीचा असल्याबाबतची माहिती स्थायीच्या सदस्यांना देण्यात आली. कस्थायी समितीचे सदस्य तथा शिक्षण सभापती अॅड. बोधराज चौधरी, बांधकाम सभापती अमोल इंगळे, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर, आरोग्य सभापती मेघा देवेंद्र वाणी, महिला व बालकल्याण सभापती अनिता सोनवणे, सदस्य प्रितमा गिरीष महाजन आदी उपस्थित होते.