स्थायी समितीकडून 83 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजूरी

0

माध्यमिक शाळा इमारत बांधण्यास 12 कोटी 28 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता

स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांची माहिती

पिंपरी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीने विविध विकास कामांसाठी सुमारे 82 कोटी 98 लाख रुपये खर्चास आज (बुधवारी) मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. बोर्‍हाडेवाडी येथील गायरान जागेवर शाळा इमारत बांधणेकामी 11 कोटी 75 लाख रूपयांच्या खर्च करण्यात येणार आहे. आरक्षण क्रमांक 2/122 शाळेच्या इमारत बांधण्यासाठी 11 कोटी 79 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत दत्तवाडी, विठ्ठलवाडी परिसरात आवश्यकतेनुसार जलनि:सारण सुधारणा कामे करण्यास सुमारे 32 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. नाशिक हायवेच्या पुर्वेकडील भागात मलनि:सारण नलिकांची कामांस येणा-या 36 लाख रूपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.

ड्रेनेज लाईन स्थलांतरण…
ड प्रभागातील नदीच्या कडेने असलेल्या गुरूत्व वाहिनीचे देखभाल दुरूस्ती कामे करणे, त्या कामास सुमारे 38 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. किर्तीनगर, विनायकनगर, समर्थनगर, उर्वरित भागामध्ये ड्रेनेज लाईन, चेंबर्सची देखभाल आणि दुरुस्ती करण्यास 46 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नाल्यातील अस्तित्व असलेली ड्रेनेज लाईन स्थलांतरीत करण्यास 67 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. विवेकनगर, तुळजाई भागातील डी.पी.रस्त्याचे क्रॉकीटीकरण करण्यास सुमारे 3 कोटी 35 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. निगडीतील सेक्टर -22 मधील विद्युत दाहिनीचे वार्षिक पद्धतीने चालन देखभाल करण्यास 34 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार रस्त्यांचा विकास…
प्रभाग क्रमांक 15 मधील मनपा इमारतीची देखभाल दुरूस्तीची कामे करणे, फर्निचर व्यवस्था करण्यास 28 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. आकुर्डी रेल्वे स्टेशन ते पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय पर्यंतचा 18 मीटर रुंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसित करणे. या कामांतर्गत विद्युत विषयक कामे करण्यास सुमारे 75 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 5 गवळीनगर आणि सँडविक कॉलनी परिसरात बंद पाईप गटर, स्थापत्य विषयक कामे करण्यास सुमारे 47 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. सांगवी केंद्राअंतर्गत प्रभाग क्रमांक 31 रामनगर आणि उर्वरित ठिकाणी जलनि:सारण व्यवस्थेत सुधारणा करण्यास सुमारे 46 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. चिंचवड लिंकरोड बाजूकडील यशोपुरम, संत गार्डन, साई ग्रेस सोसायटी समोरील व एम्पायर ईस्टेट याठिकाणच्या उड्डाणपुलाखाली स्थापत्य विषयक कामे करण्यास 9 कोटी 23 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

रस्त्यांचे डांबरीकरण आणि देखभाल…
मैलाशुद्धीकरण केंद्र व पंपीग स्टेशनमधील विद्युत पुरवठा पुर्ववत करणे, आवश्यक व अनुषंगिक कामे करण्यास 81 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत थेरगाव उपविभाग वार्ड क्र.23 मधील रस्त्यावरील रुंदीकरणातील व सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्युत मंडळाचे लघुदाब/उच्चदाब खांब, तारा व फीडर पिलर हलविण्यास 28 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 14 मध्ये फुटपाथ, स्ट्रॉर्म वॉटर व इतर स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करण्यास 26 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.27 रहाटणी श्रीनगर, नखातेनगर, साईसागरनगर परीसरात रस्ते क्रॉकीटचे करण्यास 13 कोटी 44 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.2 मधील गट नं. 606 आरक्षण 1/446 याठिकाणी माध्यमिक शाळा इमारत बांधण्यास 12 कोटी 28 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तापकीरनगर, बळीराज कॉलनी व गावठाण अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास 11 कोटी 68 लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.