पिंपरी : महापालिका स्थायी समितीची बुधवारी होणारी साप्ताहिक सभा तहकूब करण्यात आली. विषयपत्रिकेवर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बो-हाडेवाडी येथे बांधण्यात येणार्या 1288 सदनिकांच्या कामासाठी मंजुरी देण्याचा विषय होता. त्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये तीन ठेकेदारांनी भाग घेतला होता. याच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला होता. तसेच ’ड’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील कुंड्या, रस्त्याच्या कडेच्या कचर्याचे ढीग, मोकळ्या जागेतील कचरा उचलून तो मोशीतील कचरा डेपो येथे टाकण्याचे काम करणा-या ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा विषय होता. मात्र, धुळे, दिल्ली येथील मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून सभा पुढील बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली.