स्पर्धेच्या तयारीसाठी क्रीडामंत्री गोयल मुंबईत

0

नवी दिल्ली । ऑक्टोबरमध्ये होणार्‍या फिफाच्या अंडर-17 ज्युनियर फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल हे बुधवारी महाराष्ट्र दौर्‍यावर येत आहेत. महाराष्ट्रातल्या फुटबॉलशौकिनांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एकूण 24 सामन्यांपैकी 8 सामने हे नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहेत.

यामध्ये सेमीफायनलचाही समावेश आहे. खेळ हा विषय राज्यसूचीतून आता समवर्ती सूचीत टाकण्याची तयारी सुरु असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितले . शिवाय 2020 च्या ऑलिम्पिकच्या निमित्ताने भारत सरकारची विशेष तयारी सुरु असल्याचंही त्यांनी नमूद केले. विजय गोयल हे स्टेडियमचा पाहणी दौरा करणार आहेत. शिवाय कांदिवलीतल्या साई सेंटरसंदर्भात महत्वाच्या कराराबद्दल महाराष्ट्र सरकारशी बोलणी होणार आहे.