भुसावळ- जागतिक स्तरावर स्पर्धा वाढल्या असून स्पर्धेच्या युगात शिक्षण असल्यानंतरच टिकाव लागणार आहे त्यामुळे पाल्यांनी आपल्या पाल्याला उच्च शिक्षित केल्यास समाजाचीदेखील निश्चित प्रगती होईल, असा आशावाद आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केला. लोणारी समाज मंगल कार्यालयात बुधवारी जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी ते
बोलत होते.
समाज मंगल कार्यालयासाठी मिळाली जागा
आमदार सावकारे म्हणाले की, मंत्री असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी समाजाच्या सभागृहांसाठी निधी दिला. भुसावळ येथील सभागृहासाठीदेखील 20 लाख रुपयांचा निधी पडून आहे मात्र एका समाजबांधवाकडून त्यात अडथळे आणणण्यात आले. ही जागा मिळवण्यासाठी तब्बल चार वर्ष लागले. आता प्रशस्त अद्ययावत श्री संत रोहिदास महाराज भवन बांधण्यासाठी दोन एकर जागा मिळाली आहे. अद्ययायावत व सुविधांयुक्त व विद्यार्थ्यांना उपयोग पडेल असे भवन बांधण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला. दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर म्हणाले की, जाती-भेदाच्या काळात अस्पृश्य समजाचा संत होणे ही अभिमानास्पद बाब आहे. संत रविदासांचे विचार व दोहे वाचली पाहिजेत.
अॅपचे उद्घाटन
वेलनेस फाऊंडेशनचे संचालक निलेश गोरे यांनी संत रोहिदास डिरेक्टेरी, जळगाव या नावाने अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून जळगाव शहरासह 17 तालुक्यातील समाजबांधवांची माहिती, त्यांचे व्यवसाय व रक्तसुचीची माहिती उपलब्ध होणार आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकमेकांपासून दुरावलेले समाज बांधवाना एकत्र करण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. या अॅपचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
दिव्यांगाना सायकल वाटप
सामाजिक न्याय विभागाकडून 11 दिव्यांगाना सायकलचे वाटप झालेे. यात प्रकाश सोनवणे, परवीण अब्दुल खाटीक शेख, रूपाली चिमणकर, जान्हवी शिंदे, भगवान सावळे, किशोर शेकोकार, सुधाकर नानोटे, मधुकर पाटील, शे. तस्लीम शे. वाहेब यांचा समावेश आहे.
यांची होती उपस्थिती
जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, भुसावळचे प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, पंचायत समिती सभापती सुनील महाजन, विजय सुरवाडे, योगीता वानखेडे, जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे, चंद्रशेखर अत्तरदे, फुलगाव सरपंच वैशाली टाकोळे, नगरसेवक पिंटू कोठारी, किरण कोलते, सुनल नेवे, बोधराज चौधरी आदि उपस्थित होते. सूत्रसंचलन संजय भटकर व आभार संदीप सुरवाडे यांनी मानले.