* नवविवाहित व गरोदर महिलांसाठी उपयोगी
* लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव – शहरातील स्पर्श संस्थेतर्फे गरोदर आणि नवविवाहित महिलांसाठी उद्या दि.19 पासून पाच दिवसीय गर्भसंस्कार कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. महिलांसाठी नेहमी उपक्रमशील सामाजिक कार्यक्रम राबविणार्या स्पर्श संस्थेमार्फत जळगाव शहरात गर्भसंस्कार कार्यशाळा घेण्यात येत आहे. 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान रोज तीन तास घेण्यात येणार्या कार्यशाळेत गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी, येणार्या समस्या, त्यांचे निराकरण, बाळाचा शारीरिक, मानसिक विकास, आहार, विहार, प्राणायाम, ध्यान, आसन तसेच नवजात शिशुचे संगोपन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आजच्या फास्टफूड आणि धकाधकीच्या जिवनात आई होण्याचा सुखद अनुभव घेताना गर्भसंस्कार आवश्यक आहे.
शहरातील तज्ज्ञ सौ.उज्वला टाटीया यांच्यासह महिला डॉक्टर डॉ.मनीषा दमानी, डॉ.चंचल शहा, डॉ.विशाखा गर्गे या सामाजिक दायित्व म्हणून कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहे. शास्त्रोक्त पद्धती आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात येते. कार्यशाळेत आगाऊ नोंदणी करण्यासाठी आनंद निवास, 20-विद्यानगर, सागरपार्क जवळ, जळगाव याठिकाणी किंवा उज्वला टाटीया 0257-2233829 व डॉ.विशाखा गर्गे 2228178 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात होणार्या या कार्यशाळेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्पर्शतर्फे करण्यात आले आहे.