स्पीकरचा आवाज डेसिबलच्या मर्यादेत ठेवावा

0
थर्टीफस्टच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची व हॉटेल व्यावसायिकांची बैठक
लोणावळा शहर पोलिसांनी केले आवाहन
लोणावळा : थर्टीफस्ट डिसेंबर हा सर्वांत मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा दिवस आहे. तरूणाई, मित्र-मित्र, कुटुंबिय सारेच हा दिवस जोरात साजरा करीत असतात. मात्र हा दिवस साजरा करताना अनेकांकडून कायद्यांचे उल्लंघन केले जाते. दारू पिऊन नववर्ष साजरे करणे हा सध्या पडत असलेला पायंडा आहे. दारू पिऊन गाडी चालविणे, चौकां-चौकांमध्ये मोठ्या आवाजात डीजेच्या आवाजात नाचणे, कर्णकर्कश फटाके फोडणे असे नागरिकांना डोक्याला आणि कानांना त्रास होईल असे वर्तन सुरू असते. शहरातील हॉटेल व्यावसायिकही यामध्ये सामील असतात. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमांच्या दरम्यान हॉटेल व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करत सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात. स्पीकरचा आवाज डेसिबलच्या मर्यादेत ठेवावा, असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे.
पर्यटकांची गर्दी होणार 
ख्रिसमस, थर्टीफस्ट व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी प्रमाणे यंदा लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकतीच लोणावळा शहर पोलिसांनी शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेत त्यांना सुरक्षेसंदर्भात सूचना दिल्या. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी यावेळी व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. हॉटेलच्या आवारात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची मुख्य खबरदारी घेत हॉटेलात येणार्‍या  वाहनांची तपासणी व नोंदी ठेवणे, पर्यटकांच्या ओळखपत्रांची तपासणी करणे, पार्टी दरम्यान काही अनुचित प्रकार घडणार नाही. याची दक्षता घेत पुरेसा सुरक्षा बंदोबस्त तैनात करणे, थर्टीफस्ट व न्यु इयर पार्टी करिता सर्व शासकीय विभागांचे परवाने घेऊनच सेलिब्रेशन साजरे करावे, पार्टी दरम्यान लावण्यात येणार्‍या स्पिकरचा आवाज हा डेसिबलच्या मर्यादेत असावा, हॉटेलच्या आवारातील हालचाली टिपण्याकरिता सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना करण्यात आल्या.
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य 
पोलीस उपअधिक्षक शिवथरे म्हणाले की, नियमांचा कोणीही भंग करु नका. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्या. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. खासगी बंगले धारकांनी परवाना न घेता बंगले भाड्याने दिल्यास त्याच्यावर कलम 188 प्रमाणे खटले दाखल करण्यात येतील. पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की, कोणत्याही व्यावसायिकांला त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची असल्याने प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. दिलेल्या सुचनांचे पालन करावे. हायवे लगतच्या व्यावसायिकांनी महामार्गावर अथवा मुख्य मार्गावर ची पाण्याची भरलेली बाटली ठेवून तिच्या झाकणाला बारीक छेद घेऊन त्यातून एक सुतळी पाण्यात सोडून तिचे दुसरे टोक झाडाच्या मुळाशी ठेवले. त्यामुळे बाटलीमधील पाणी सुतळीच्या साहाय्याने ठिबकसिंचनाद्वारे झाडाच्या मुळाशी पोहोचणार आहे. गडावरील झाडे उन्हाळ्यातही तग धरणार आहेत.
कमी कष्टात महत्वाचे काम 
उन्हाळ्यात झाडांना पाण्याची जास्त गरज असते. मात्र गडावर पाणी मिळतेच असे नाही. त्यामुळे प्रयत्नपूर्वक लावलेल्या या झाडांचे नुकसान होऊन ते कोमेजतात. त्यामुळे व्हॉटस्अपवर हे पाण्याचा उपयोग पहायला मिळाले. त्यानुसार हे झाडांच्या मुळांशी ओलावा राहिल यासाठी ही पद्धत उपयुक्त असल्याचे जाणवले. झाडाच्या पायथ्याशी ठेवलेली बाटली दोन दिवस चालेल म्हणजे रोज बाटली भरण्याचे काम करावे लागणार नाही. कमी कष्टात महत्वाचे काम होईल. परिणामी गडावर वृक्ष संपत्ती वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.