नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये शुक्रवारी नवीन नऊ शहरांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या शहरांमध्ये सेल्वासा, ईरोड, दीव, बिहारशरीफ, मुरादाबाद, बरेली, इटानगर, सहारनपूर आणि कवाराट्टी या शहरांचा समावेश आहे. यामध्ये 12 हजार 800 कोटी पेक्षादेखील जास्त रक्कम सरकार खर्च करणार आहे. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दमन आणि दीव, गुजरात, दादर-नगरहवेली राज्यांतील ही शहरे आहेत. या नवीन शहरांमुळे पुणेसह आता एकूण 99 शहर या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.