’स्मार्ट सिटी’ सह ’स्मार्ट व्हिलेज’ची संकल्पना राबवा

0

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांचे आवाहन
नंदुरबार – स्वातंत्र्याच्या 70 वर्षे नंतर हे गाव पाड्यात अजूनपर्यंत पोहोचू शकले नाही हे दुर्दैवच आहे. शासनाने शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागाकडे लक्ष दिले पाहिजे. ’स्मार्ट सिटी’ करीत असतांना ’स्मार्ट व्हिलेज’ ची संकल्पना राबवा. जेणेकरून ग्रामपंचायती अधिकाधिक सक्षम होतील असे प्रतिपादन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर यांनी केले. 27 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जयंत पाटील बोलत होते.

यांची होती उपस्थिती
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जगताप, जि.प सदस्य भरत गावित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, नाशिक विभाग सरपंच परिषदेचे संघटक देवमन पवार, जिल्हाध्यक्ष राहुल गावित, तळोदा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, धडगाव तालुका ध्यक्ष सीताराम पावरा, नवापुर तालुकाध्यक्ष अनिल गावित आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष राहुल गावित यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत पाटील -कुर्डूकर होते.

सरपंचांच्या मानधनात वाढ करा
आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी सारखेच सरपंच यांनाही मानधन द्यावे. अल्प मानधनात शासन सरपंचांची पदरमोड करीत आहे. परिषदेच्या वतीने राज्यात 10 जिल्हे व 35 तालुक्यांमध्ये आतापर्यंत मिळावे घेतलेले आहेत. यापुढे सरपंचांचे एकत्रीकरण करून अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली

यांनी घेतले परिश्रम
मेळाव्याला जिल्ह्यातील अनेक गावांचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांची उपस्थिती होती. मेळावा यशस्वीतेसाठी अंकुश वसावे, दिलीप गावित, गोरजी गावित, सुनील वसावे, नकुल देसाई, किरण गावित, दिलीप वडवी, विकास गावित, विजू कोकणी, प्रकाश नाईक, आनंद नाईक, प्रमोद वळवी, मनोज गावित, अनिल गावित, सुनील गावित यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दिलीप गावित यांनी तर आभारप्रदर्शन देवमन पवार यांनी केले.