स्मृती इराणी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

पुणे:अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात आज खटला दाखल करण्यात आला आहे. मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रूपाली पाटील यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत खटला दाखल केला आहे.

स्मृती इराणी यांच्या पदवीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पदवीधर असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करणाऱ्या स्मृती इराणी यांनी यावेळी मात्र केवळ १२ वी पास असल्याचे नमूद केले असून काँग्रेसने त्यावर निशाणा साधत ‘क्योंकी मंत्रीजी भी कभी ग्रॅज्युएट थी,’ असा टोला लगावला होता. त्यावर भाजपकडून ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसवर पलटवार केला होता. आमच्या उमेदवारांच्या पदव्यांवर बोलण्याआधी स्वत:कडे पाहा. राहुल गांधी तर मास्टर्स न करताच एमफिल झाले आहेत, असा टोला जेटली यांनी लगावला होता.