पिंपरी-चिंचवड : महापालिकेतर्फे स्वच्छता अभियानांतर्गत खासगी रुग्णालये, हॉटेल, शाळा अशा गटात स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये सर्वात स्वच्छ रुग्णालयात आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल (थेरगाव), हॉटेलमध्ये हार्ड कॅस्टल रेस्टॉरंट (संतोषनगर,थेरगाव), तर हाऊसींग सोसायट्यामध्ये रोझलँड रेसिडेन्सी- (पिंपळे सौदागर) व पलाश सोसायटी यांनी पहिला नंबर पटकावला आहे.
प्रोत्साहन मिळण्यासाठी स्पर्धा
स्वच्छ भारत अंतर्गत शहरात स्वच्छ सर्वेक्षणाला 4 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये 4 हजार 41 शहरांनी भाग घेतला आहे. या अभियनात नागरिकांचा सहभाग वाढवणे, त्यांच्या आसपासचे आवार स्वच्छ ठेवणे हे प्रमुख हेतू असतो. यातून महापालिकेने स्वच्छ हॉटेल्स, शाळा, हॉस्पीटल्स, गृहनिर्माण संस्था, मंडई या सहा गटामध्ये स्वच्छता स्पर्धांचे आयोजन केले होते. परिसर स्वच्छता, शौचालय सुविधा, स्वच्छता साधनांचा वापर, ओला व सुका कचरा वर्गीकरण, पायाभूत सुविधा, स्वच्छता अॅप डाऊनलोड इ. निकषांचे आधारे गुणांक देण्यात आले होते.
270 रुग्णालयांचा सहभाग
शहरातील 270 हॉस्पीटल्सने स्वच्छता स्पर्धेसाठी अर्ज केले होते. वैद्यकीय संचालक, वैदयकीय विभाग यांचेमार्फत शहरातील हॉस्पीटल यांची तपासणी करुन तीन खासगी रुग्णालयांचे गुणांकनानुसार क्रमांक काढण्यात आले. यामध्ये आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांचा प्रथम, क्रेडल मॅटर्निटी ऍन्ड वुमन्स केअर यांना द्वितीयव ओएसिस हॉस्पीटल यास तिसरा क्रमांक देण्यात आला.
स्वच्छ हॉटेलला प्रतिसाद
आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत 144 हॉटेलची तपासणी करण्यात येऊन स्वच्छ हॉटेल स्पर्धांचे गुणांक देण्यात आले आले. यामध्ये प्रथम क्रमांक हार्ड कॅस्टल रेस्टॉरंट-संतोषनगर, थेरगाव, द्वितीय पंचशिल- इंदिरानगर, तृतीय जींजर, मुंबई पुणे हायवे, 4) माईंड स्पेस- पिंपरी, 5) बारबेक्यु नेशन्स – मोरवाडी व फर्न रेसेडेन्सी- एमआयडीसी या 6) हॉटेल्स यांना गुणांकानुसार प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सयाजी हॉटेल-वाकड, कलासागर-एसबीआय बँक, शिवाई- एमआयडीसी पिंपरी व किज हॉटेल- मोरवाडी जुना पुणे मुंबई रस्ता यांना द्वितीय क्रमांक व अन्नपुर्णा इटरिज- आकुर्डी रेल्वे स्टेशन यांस तृतीय क्रमांक देण्यात आलेला आहे.
पाच शाळा ठरल्या अव्वल
शाळामध्ये महापालिकेने पाच शाळांना प्रथम क्रमांक दिला असून माळवाडी, पिंपळेगुरव, तळवडे, मोहननगर मुले व कन्या, अजंठानगर मुले व कन्या या पाच शाळा स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल ठरल्या आहेत.तर पिंपरी मनपा शाळा निगडी मुले व कन्या व च-होली विदयानिकेतन या दोन शाळांना द्वितीय व खराळवाडी मुले व कन्या शाळेस तृतीय क्रमांक देण्यात आला.
सर्व सोसायट्या सरस
इ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 3 मधील जेनेसीस सोसायटी, वडमुखवाडी च-होली, प्रभाग क्रमांक 4 मधील पोलाईट पॅनोरमा दिघी, प्रभाग क्रमांक 5 गवळीनगर येथील क्षितीज डिस्टीनेशन, आळंदीरोड भोसरी व ड क्षेत्रीय कार्यालयातील 29 गृहनिर्माण सोसायटींची तपासणी करुन रोझलॅड रेसिडेन्सी- पिंपळे सौदागर व पलाश को हौ सोसायटी – युरो स्कुल जवळ वेणुनगर यांस प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. ग्लिटराटी अपार्टमेंट – पिंपळे निलख या सोसायटीस द्वितीय क्रमांक तसेच कल्पतरु इस्टेट फेज 3 बिल्डींग नं 7 जवळकरनगर यांस तृतीय क्रमांक देण्यात आला.