स्वच्छता अ‍ॅपच्या वापरानूसार देशात जळगाव 75 व्या स्थानी

0

जळगाव । देशभरातल्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्व्हेक्षणात 4 हजार 41 शहरांमध्ये जळगाव शहराचा समावेश असून या स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी ‘स्वच्छता अ‍ॅप’ तयार करण्यात आले आहे. या स्वच्छता अ‍ॅपच्या तक्रारी निराकरण व अ‍ॅपच्या वापरानूसार देशात जळगाव शहराला 75 वा क्रमांक मिळाला आहे. स्वच्छता सर्वेक्षणाबाबत नगरसचिव विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी मंत्रालयात बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील स्वच्छतेच्या उपायोजनांची माहिती घेण्यात आली असल्याचे अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी सांगितले आहे. केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत मिशन ही मोहिम राबविली जात आहे. त्यात देशातील 4 हजार 41 शहराचा सहभाग आहे. त्यात महाराष्ट्रातील अमृत योजनेतील असलेल्या जळगाव शहराचा देखील सहभाग आहे. 2016 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात मानपाची यापूर्वी 373वा क्रमांक आला होता. आता स्वच्छ सर्वेक्षणात जळगावचा 75 क्रमांक आहे. त्यात शासनाने तयार केलेला स्वच्छता मोबाईल अ‍ॅप तयार केले असून शहराला 10 हजार लक्ष दिले असून आतापर्यंत 1 हजार 700 जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलेले आहे अशी माहिती कानडे यांनी दिली.

स्वच्छतादूतामार्फत जनजागृती
स्वच्छ सर्वेक्षणाचे देशभरात सुरू असून केंद्र सरकारचे पथक जळगाव शहरात 4 जानेवारी नंतर येणार आहे. तर मनपा प्रशासनाकडून घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात तसेच कचर्‍यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत मोफत करून देण्याचा एका एजन्सीचा प्रस्ताव आला असून तो महासभेपूढे मांडला जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती समोर आली आहे. प्रधान सचिव म्हैसकर यांनी घेतल्या बैठकीत प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी जळगाव शहरातील स्वच्छता उपाययोजनांची माहिती दिली. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पाच स्वच्छता दूत नेमल्याची तसेच, यासाठी शहरातील 40 हजार नागरिकांच्या अ‍ॅड्रॉइड मोबाइलच्या व्हॉट्सऍपवर स्वच्छता मोबाइल अ‍ॅपची लिंक टाकली जाणार आहे.