‘स्वच्छता हिच सेवा’ हा संदेश मनामनात रुजवा

0

फैजपूर । संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज रांनी स्वच्छतेचे महत्व समजूत घेत स्वत: हाती झाडू घेऊन गावोगावी जात नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. स्वच्छता ही एकप्रकारची सेवा असून हा संदेश प्रत्रेकाच्रा मनामनात रुजविण्राची आवश्रकता असल्राचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांनी येथे केले. धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे केंद्र शासन पुरस्कृत ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

यांनी घेतले परीश्रम
एस.एम.राजपूत, संजय महाजन, व्ही.एल.विचवे, लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी परिश्रम घेतले. उपाध्यक्ष प्रा.डॉ. एस.के.चौधरी यांची उपस्थिती हो. यशस्वीतेसाठी शेखर महाजन, चेतन इंगळे, शुभम मोरे, विनायक कोळी, भुषण तायडे, शुभम चौधरी आदींचे सहकार्य लाभले.

एनसीसी अधिकार्‍यांसह 300 कॅडेटस् सहभागी
महात्मा गांधींच्या जयंतीप्रीत्यर्थ स्वच्छ, सुंदर भारताच्या स्वप्नपुर्तीसाठी एनसीसीने पुढाकार घेतला. डीजीएनसीसी दिल्ली यांच्या परिपत्रकानुसार 18 महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल दिलीप पांडे व प्रशासकीय अधिकारी कर्नल अ‍ॅलेक्स जोसेफ यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयात स्वच्छतेच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात चार एनसीसी अधिकारी आणि सुमारे 300 एनसीसी कॅडेटस्नी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.