अमळनेर । केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने स्वच्छ महारष्ट्र अभियान अंतर्गत अमळनेर शहर हागणदारी मुक्त आणि घनकचरा व्यवस्थापनातर्गत स्वच्छ शहर या दोन प्रमुख बाबीसाठी अमळनेर शहर हागणदारी मुक्त आणि स्वच्छ शहर जाहिर केलेले आहे. त्या अनुषंगाने येत्या 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशा आशयाचे पत्र नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे केंद्र शासनाच्या आवालानुसार या अभियांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने ’स्वच्छता हीच सेवा’ या विषयावर एक राष्ट्रव्यापी मोहिम राबवली जात आहे.
अनुषंगाने 15 सप्टेबर रोजी स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा औपचारिक रित्या प्रारंभ, 17 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत श्रमदान करून सेवा दिवस साजरा करणे,दि 24 रोजी समाजातील सर्व घटकाना श्रमदानात सहभागी करून घेवून समग्र स्वच्छता करणे, 25 रोजी शहरातील हॉस्पिटल उद्याने, पुतळे व स्मारके, बस थांबे, तलाव आणि स्वच्छता ग्राहकांची व्यापक प्रमाणात सफाई करून सर्वत्र स्वच्छता करणे, 1 ऑक्टोबर रोजी शहरातील प्रसिद्ध स्थळाच्या ठिकाणी व्यापक श्रेष्ट स्वच्छता मोहिम राबविने या स्वरुपात अमळनेर नगरपरिषद कार्यक्रम राबविणार असून या मोहिमेत अमळनेर शहरातील नागरिकांनी सहकार्य व सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.