स्वच्छतेविषयी जनजागृतीकरीता पालकसभा

0

वाघाडी । आर.सी.पटेल प्राथमिक शाळा रामसिंगनगर शिरपूर येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेचा संदेश पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी इ.7 वी चा विद्यार्थी भुमेश्‍वर जितेंद्र राजपूत याचा किर्तनाचा कार्यक्रम पालक सभेत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक हजर होते. स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड विषयी मार्गदर्शन ए.बी.हातेडकर व विनोद माळी यांनी केले.

स्वच्छतेचे महत्त्व मुख्याध्यापक आर.बी.खोंडे यांनी समजावून सांगितले, पालकांनी संपूर्ण सहकार्य करु असे आश्‍वासन दिले. पालक सभा यशस्वी होण्यासाठी शिक्षक व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.