स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान

0

पिंपरी चिंचवड :  महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पर्यावरण संवर्धन समितीचे सहकार्याने शाळांमध्ये श्रमदान, स्वच्छतेची शपथ, प्रभात फेरी, निबंध, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करुन विविध उपक्रम राबविण्यात आले. ऑटोक्लस्टर येथे या उपक्रमात सातत्याने सहभागी शाळांस स्वच्छ भारत अभियान जनप्रबोधन व सहभाग पत्र वितरण तसेच ज्या शाळांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग शाळेमध्ये केले आहे, त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. महापौर राहुल जाधव, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, रामदास तांबे कार्यकारी अभियता पाणीपुरवठा, सोमनाथ मारणे-रेन वॉटर हार्वेस्टींग तज्ञ, राजेंद्र आहेर, पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष विकास पाटील, विश्‍वास जपे, पुरुषोत्तम पिंपळे व सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ईसीएचे स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.

स्वच्छता अभियानात विदयार्थ्यांचा सहभाग घेऊन पर्यावरण पुरक कार्यक्रम राबवुन योगदान दिल्याबददल शिक्षकांचे व पर्यावरण संवर्धन समितीचे अभिनंदन अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी यावेळी केले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्लास्टिक बंदी, कचरा विल्हेवाट, परिसर व शौचालय स्वच्छता, ओला व सुका कचरा विलगीकरण, स्वच्छता ऍप डाऊन लोड या उपक्रमाकरिता प्रत्येक विदयार्थी व शिक्षक यांचे योगदान मिळाला आहे, ते स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छता दुत आहेत या शब्दांत दिलीप गावडे यांनी कौतुक केले.

नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक, विदयार्थी व शिक्षक या सर्वांचे योगदान व सहभाग मिळाले आहे यापुढेही हे योगदान मिळेल अशी आशा यावेळी व्यक्त केली. पाण्याचा प्रश्‍न बिकट असुन इतर शहरांच्या तुलनेने पुरेसे आणि शुध्द पाणी नागरिकांना मिळत आहे. पाण्याचे जतन करुन अपव्यय टाळवा असे आवाहन यावेळी केले. कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी यांनी रेन वॉटर हावेस्टींग प्रकल्प यावर सादरीकरण करुन याची माहिती व महत्व यावेळी विशद केले.