स्वच्छ सर्वेक्षणात जिल्ह्यात वरणगाव पालिका प्रथम

0

यशाचे श्रेय वरणगावकरांचे -नगराध्यक्ष सुनील काळे

भुसावळ- केंद्र सरकार व राज्य सरकारच्या स्वच्छ अभियान सर्व्हेक्षण 2019 चा निकाल जाहीर झाला असून त्यात वरणगाव नगरपरीरषदेचा देशात 79 वा तर जळगांव जिल्यात प्रथम व नाशिक विभागात द्वितीय क्रमांक जाहीर झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू झाले होते. त्यात वरणगाव नगरपरीषदेने सहभाग घेऊन सक्रिय सहभाग घेतला. नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्यधिकारी बबन तडवी, आरोग्य अभियंता गणेश चाटे, सर्व सन्मानीय नगरसेवक तसेच वरणगाव शहरातील 50 हजार नागरीकांनी सहभाग घेतल्यानेच जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवता येणे शक्य झाल्याची नगराध्यक्ष सुनील काळे यांनी व्यक्त केली.

पदाधिकार्‍यांनी केले वरणगावकरांचे कौतुक
उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी बबन तडवी, अभियंता गणेश चाटे, भैय्यासाहेब पाटील, अधीक्षक सूर्यवंशी, सर्व सन्मानीय नगरसेवक माला मेढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, शशी कोलते, राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, विष्णू खोले, प्रतिभा चौधरी, रवींद्र सोनवणे, अरुणाबाई इंगळे, जागृती बढे, रोहिणी जावळे, वैशाली देशमुख, गणेश धनगर, नितीन माळी, विकिन भंगाळे, डॉ.विनोद चौधरी, सुधाकर जावळे व नगरपरीषदेच्या सर्व कर्मचार्‍यांनी वरणगावकारांचे अभिनंदन केले आहे.