वरणगाव । नगर परीषदेतर्फे शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाविषयी नागरीकांना माहिती व्हावी याकरीता वरणगाव शहरात चौका-चौकात पथनाट्याद्वारे जनजागृती द्वारे ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून नगरपरीषदेच्या घंटागाडी, ट्रॅक्टरमध्ये टाकावा , उघड्यावर शौचास बसू नये, सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर घाण कचरा टाकू नये तसेच प्लॅस्टीक कॅरीबॅग असल्याने कापडी बॅग वापराव्यात,परीसरातील स्वच्छतेविषयी काही तक्रार असल्यास स्वच्छ सर्वेक्षणाचा अॅप डाउनलोड करून तक्रार नोंदविण्याविषयी माहिती दिली.
या भागात झाली जनजागृती
वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगर, बसस्थानक चौक, रामपेठ , बाजार गल्ली, गांधी चौक, मोठी होळी, नारीमळा, सिनेमा रोड, भोगावती नदी, अक्सानगर तसेच शहरातील विविध भागात पथनाट्य सादर करून जनजागृती केली जात आहे. पालिकेचे नगराध्यक्ष नवनिर्वाचीत सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अरवलाक व सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच कर्मचारी गंभीर कोळी, संजय माळी., सुरेश शेळके, राजू गायकवाड, अनिल चौधरी, संगीता भैसे, कृष्णा माळी, प्रशांत माळी, रवींद्र धनगर आदींची उपस्थिती होती. पथनाट्यास नागरीकांनी प्रतिसाद देत अभियान राबविण्याकरीता नागरीकांनी सहकार्य करावे, असे वरणगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.