पिंपरीचिंचवड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक 14 मधील सार्वजनिक स्वच्छता गृह अद्यावत आणि नुतणीकरणासाठी 41 लाख 62 हजार 625 एवढ्या खर्चाचा विषय ऐनवेळी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. या खर्चाला स्थायी समितीची मंगळवारी मंजुरी मिळाली. कामासाठी मे. एस. एस. एंटरप्राईजेस, मे. प्रकाश कॉन्ट्रक्टर आणि मे. श्री गुरू कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. यातील मे. एस. एस. एंटरप्राईजेस यांना काम देण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव पालिकेतील स्वच्छ भारत अभियान कक्षातर्फे स्थायीसमोर ठेवला होता. हे काम 16.20 टक्के दराने करवून घेण्यात येणार आहे. म्हणजे या कामासाठी 34 लाख 95 हजार 924 एवढी खर्चाची रक्कम अदा करावी लागणार आहे. हे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदार सक्षम असल्याची शिफारस शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी दिली आहे.