स्वतःतील अहंकाररूपी रावणाचे प्रतीकात्मक रावणातून दहन

0

यावल येथे आमदार हरीभाऊ जावळे ; विजयादशमीनिमित्त रावण दहन

यावल- आपल्यातील द्वेष, लोभ, मत्सर, व अहंकाररूपी रावणाचे दहन विजयादशमीच्या मुहूर्तावर आपण करून या प्रतिकात्मक रुपी रावणाचे दहन आपण आज करतोय असे प्रतिपादन आमदार हरीभाऊ जावळे यांनी येथे केले. शहरात सालाबादाप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी मित्र मंडळातर्फे विजयादशमी निमित्त रावण दहनाचा कार्यक्रम व्यासमंदिराजवळील सूर नदी पात्रात सायंकाळी झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सुरेखा कोळी, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, जि.प गटनेते प्रभाकर सोनवणे, नगरसेवक अभिमन्यु चोधरी,भ गतसिंग पाटील सह नगर सेवक उपस्थित होते. प्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. उपनगराध्यक्ष तथा मंडळाचे अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन एस.के. बाऊस्कर यांनी केले. रावण दहन कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नियोजन समित अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, उपाध्यक्ष डॉ.हेमंत येवले, प्रवीण घोडके, अमोल दुसाने, अमोल भिरूड, उमेश फेगडे, तुकाराम बारी, अरुण लोखंडे, प्रभाकर वाणी, शरद कोळी, कामराज घारु, बाळासाहेब फेगडे, संजय बोंडे, संतोष कवडीवाले यांच्यासह शिवाजी मित्र मंडळाने परीश्रम घेतले.